belgaum

विकास कामांसंदर्भात मंत्री जारकीहोळींनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची भेट

0
668
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सखोल चर्चा केली.

केंद्रीय मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या आजच्या बैठकीतील चर्चेप्रसंगी प्रामुख्याने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (सीआरआयएफ) अंतर्गत निधी त्वरित वितरित करण्याची विनंती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना केली.

त्यावेळी कर्नाटकातील तांत्रिक कारणांमुळे विलंबित झालेल्या 48 प्रमुख कामांपैकी 39 प्रकल्पांशी संबंधित समस्या यशस्वीपणे सोडवण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

 belgaum

तसेच कर्नाटक राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जलद आणि कार्यक्षम कामकाजाचे कौतुक करून विभागाच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. मंत्री जारकीहोळी यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राचे सहकार्य मागितले असता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.