बेळगाव लाईव्ह : मराठा युवक संघ आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 60 व्या बेळगाव जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील बेळगाव हर्क्युलस -2026 हा किताब दावणगिरीच्या मंजुनाथ एस. याने हस्तगत केला.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित उपरोक्त स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी, ब्रिगेडियर हितेंद्र मराठे, मिहिर पोतदार, सुनील आपटेकर, मोहन चौगुले, मोहन बेळगुंदकर, जी. डी. भट्ट गणेश गुंडप, आकाश हुलीयार, बाळाराम पाटील आणि आप्पासाहेब गुरव उपस्थित होते.
समारंभाचे अध्यक्ष स्थानी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर हे होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, सचिन ऊसुलकर, अजित सिद्धनावर, मोहन चौगुले, अविनाश पाटील, शेखर हंडे, नेताजी जाधव, अभय पाटील, किरण कावळे, एम. गंगाधर, हेमंत हावळ, गणेश गुंडप, अनंत लंगरकांडे, कीर्तेश कावळे, सुनील राऊत, सचिन मोहिते, सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर, आप्पासाहेब गुरव, रघुनाथ बांडगी, दिनकर घोरपडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेळगाव हर्क्युलस -2026 किताबाच्या स्पर्धेतील पहिल्या 15 क्रमांकाचे विजेते टॉप -15 शरीरसौष्ठवपटू पुढील प्रमाणे आहेत. 1) मंजुनाथ एस. (दावणगिरी), 2) प्रशांत खन्नूकर (बेळगाव), 3) व्ही. बी. किरण (बेळगाव), 4) व्यंकटेश तहसीलदार (बेळगाव), 5) के. कुमार (बेळगाव),
6) नित्यानंद कोटियान (उडपी), 7) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 8) सुनील भातकांडे (बेळगाव), 9) अमर गुरव (बेळगाव), 10) एम. डी. साकिब (चिक्कोडी), 11) उमेश गंगणे (बेळगाव), 12) महेश पाटील (बेळगाव), 13) श्रीनिवास खारवी (उडपी), 14) अफताब किल्लेदार (बेळगाव), 15) भीष्म बी. (दावणगिरी)





