belgaum

शिवार पिवळ्याधमक रंगात न्हाऊन निघाले…

0
270
mohari
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील विशेषतः पूर्व भागात रब्बी हंगामातील पिकांनी यंदा शिवाराला नवे रूप दिले आहे. चना, हरभरा, वाटाणा, जोंधळा यांसह मोहरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या या भागातील मोहरीला फुले येऊन अवघे शिवार पिवळ्याधमक रंगात न्हाऊन निघाले आहे.

मोहरी फुलोऱ्यात आली की संपूर्ण शिवार पिवळ्या फुलांच्या चादरीने आच्छादले जाते. बेळगाव परिसरातील शिवारात तर जणू भंडाऱ्याची उधळण झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. दूरवर पसरलेली शेती, त्यावर उमललेली मोहरीची पिवळी फुले आणि थंड हवेची सुखद झुळूक — या साऱ्यांनी शिवार निसर्गसौंदर्याने नटून उठले आहे.

यंदा रब्बी हंगामातील कडधान्य आणि कडपाल पिकांची मोहिनी जोर धरू लागली आहे. कडाक्याच्या थंडीचे पोषक वातावरण पिकांच्या वाढीस अनुकूल ठरत असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत आहे. थंडी, दव आणि सकाळची हलकी धुके यामुळे पिकांना आवश्यक असलेली ओल टिकून राहिली आहे.

 belgaum
mohari

हिरव्यागार पिकांमधून डोकावणारी पिवळी मोहरी, पक्ष्यांची किलबिल आणि शांत शिवार — हे दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमींनाही शिवाराकडे ओढले जात आहे. रब्बी हंगामातील ही बहरलेली शेती केवळ उत्पादनाचेच नव्हे, तर शिवाराच्या सौंदर्याचेही वैभव ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.