belgaum

व्यंकटेश तहशिलदार ठरला ‘मच्छे श्री फीट प्रो क्लासिक’ किताबाचा मानकरी

0
468
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित मच्छे श्री फीट प्रो क्लासिक -2026 या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील विजेतेपदाचा ‘मच्छे श्री फीट प्रो क्लासिक’ किताब पॉलिहाइड्रोन जिमच्या व्यंकटेश तहशिलदार याने हस्तगत केला. तसेच फिट प्रो टॉप -10 या व्यायामशाळा (जिम) पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा विजेता फिट प्रो जीमचा शुभम चौगुले हा ठरला.

फिट-प्रो फिटनेस स्टुडिओ अँड फिट प्रो न्यूट्रिशन यांनी पुरस्कृत केलेल्या उपरोक्त स्पर्धा नुकत्याच जिजामाता चौक, गणपत गल्ली मच्छे, बेळगाव येथे पार पडल्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, पुंडलिक जैनोजी, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच अजित सिद्धनावर, बीडीबीए कार्यकारी अध्यक्ष गंगाधर एम., सरचिटणीस हेमंत हावळ, मारुती देवगेकर अनंत लंगरकांडे सुनील राऊत सुनील पवार नूर मुल्ला आकाश हुलीयार गजानन हंगिरगेकर सुनील अष्टेकर नागराज कोलकार, कृष्णा जैनोजी जयराज मुचंडीकर आदी उपस्थित होते.

वरीलपैकी बेळगाव जिल्हास्तरीय स्पर्धा विविध 7 वजनी गटात घेण्यात आली. तिचा निकाल गटवार (अनुक्रमे हिल्या पाच क्रमांकाचे विजेते) पुढील प्रमाणे आहे. 55 किलो गट : राजू मुचंडीकर (गोल्ड लाईफ जिम), सुभाष चौगुले (फीट प्रो), केतन भातकांडे (युनिव्हर्सल), विनायक पत्रोट (फ्लेक्स), कृष्णा हिरोजी (एसएसएस). 60 किलो गट : सुरज भंडारी (गोल्ड जिम) सागर कळ्ळीमनी (हर्षा गोकाक), साईनाथ नार्वेकर (फ्लेक्स झोन), तुषार गावडे (रुद्रा जिम) ,

 belgaum

ओमकार गवस (बर्न आउट फिट). 65 किलो गट : विशाल निलजकर (फिट प्रो) अतीशान कार्तिक (ॲस्तेटीक जीम), आफताब किल्लेदार (7 स्टार चिकोडी), किशोर पुजारी (मंथन जीम), ज्योतिबा पाटील (रुद्रा). 70 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइडरॉन), स्वप्निल कपिलेश्वरी (मोरया), लखन कांबळे (चिकोडी आखाडा), नागेश चोर्लेकर (फ्लेक्स जिम). 75 किलो गट : व्यंकटेश तहशिलदार (पॉलिहाइड्रॉन), सुनील भातकांडे (पॉलिहाइड्रॉन),

गजानन पाटील (फिट प्रो), विनीत हणमशेठ (रॉ फिट), अथर्व यादव (चिकोडी). 80 किलो गट : गजानन काकतीकर (बाल हनुमान), राहुल कुलाल (एनएक्सटी), मारुती ए. के. (डायमंड हुक्केरी), संदीप पाटील (हार्डकोर फिट), वसंत सोनलकर (बर्न आउट जीम). 80 किलो वरील वजनी गट : प्रशांत खन्नूकर (कॉर्पोरेशन जीम), विशाल चव्हाण (लाईफ टाईम), अमर गुरव (फिटनेस फोर्ज), एम. डी. साकिब डोंगरकी (7 स्टार चिकोडी), प्रवीण कणबरकर (एसएसएस एमएमएस). बेस्ट पोझर : किशोर पुजारी (मंथन जिम). टायटल विजेता : व्यंकटेश तहशिलदार (पॉलिहायड्रॉन जीम).

जिम अर्थात व्यायामशाळा पातळीवरील स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या 10 क्रमांकाचे विजेते) पुढील प्रमाणे आहे. शुभम चौगुले, गजराज पाटील, गजानन पाटील, शुभम मुतगेकर, प्रकाश गुरव, आदित्य शिंदे, सुदेश पाटील, गणेश जाधव, आदर्श कल्लेहोळकर, सुमित रामबडा. उपरोक्त स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष गंगाधर एम., सरचिटणीस हेमंत हावळ व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.