belgaum

ऑपरेशन सिंदूर’वर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांच सहभाग

0
246
 belgaum

बेळगाव  लाईव्ह:विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय घडामोडींबाबत जागरूकता, तार्किक विचारशक्ती आणि सकारात्मक स्पर्धाभाव वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेला बेळगावात मोठा प्रतिसाद मिळाला. या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्रधानाचार्य महेंद्र कालरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.


यावेळी बोलताना प्रधानाचार्य कालरा यांनी विद्यार्थ्यांना ‘परीक्षा पे चर्चा’, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि परीक्षेकडे ‘शिकण्याचा उत्सव’ म्हणून पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने व आनंदाने अध्ययन करण्याचे त्यांनी आवाहन केले.


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालय क्र. 1, 2 व 3 (बेळगाव), के. व्ही. सदलगा, के. व्ही. चिकोडी तसेच जवाहर नवोदय विद्यालय (JNV)
या नामांकित संस्थांचा समावेश होता.


‘ऑपरेशन सिंदूर’ या समकालीन राष्ट्रीय विषयावर आधारित असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे ज्ञान, विश्लेषण क्षमता, तार्किक विचार आणि निर्णयक्षमता यांची कसोटी घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘Exam Warriors’ हे प्रेरणादायी पुस्तक प्रत्येक सहभागीला भेट म्हणून देण्यात आले. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि सकारात्मकतेने परीक्षा देण्याची प्रेरणा निर्माण झाली.


शिस्तबद्ध सहभाग, उत्साही वातावरण आणि सकारात्मक स्पर्धाभावात हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी विद्यालय प्रशासनातर्फे सर्व सहभागी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.