belgaum

‘अन्नोत्सव २०२६’चा शुक्रवार पासून शुभारंभ

0
922
 belgaum


बेळगाव लाईव्ह : खाद्यप्रेमी बेळगावकरांच्या पसंतीस उतरलेला आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव २०२६’ या खाद्यमहोत्सवाचा शानदार शुभारंभ शुक्रवार, ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नानावडी येथील अंगडी कॉलेज मैदानावर होत आहे.

या भव्य महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अरुण भंडारे यांच्या हस्ते पार पडणार असून, यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो. राजेशकुमार तळेगाव यांची विशेष उपस्थिती असेल.

या सोहळ्याला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विनायक नाईक, सचिव रो. डॉ. संतोष बी. पाटील, कम्युनिटी सर्व्हिसेस डायरेक्टर रो. मुकुंद बांग, अन्नोत्सव चेअरमन रो. मनोज मायकल आणि दीपा सिदनाळ व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ९ ते १८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनानंतर ‘रुशांग’ यांचा सुफी रेट्रो संगीताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

यंदाच्या अन्नोत्सवात खाद्यपदार्थांसोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विशेष थीम डेजचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी, १० जानेवारी रोजी ‘ब्लू अँड व्हाईट डे’ साजरा केला जाईल, तर रविवारी ११ जानेवारी रोजी ‘विंटर डे’ (जॅकेट्स, हुडीज आणि स्कार्फ) ही थीम असेल.

या थीमनुसार पेहराव करून येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष फोटो बूथची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वोत्कृष्ट पेहराव करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. आदित्य मिल्क आणि किंग आईस्क्रीम हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून बीएससी टेक्सटाईल मॉल हे सिल्वर स्पॉन्सर आहेत.

चवींची विविधता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या या महोत्सवाचा बेळगावकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.