बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून, शहापूर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
उमेश कल्लप्पा कन्नूरकर (३६, रा. गणेशपेठ गल्ली, जुना बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बेळगावच्या येडियुरप्पा मार्गावरील केसरी हॉटेलजवळ आरोपी सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शहापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकंठ पुजारी आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून १,१५० रुपये रोख आणि जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्तांसह उपायुक्तांनी या यशस्वी कारवाईबद्दल पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.




