belgaum

महिलांनी दाखवलेल्या साहसामुळे मोठा धोका टळला

0
955
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शनिवार खुट या मध्यवर्ती भागातील महिला आघाडी हॉटेलमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला आहे.

शनिवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास स्वयंपाक करत असताना तळणीदरम्यान भडका उडून चिमणीला आग लागली होती. मात्र या वेळी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांनी प्रसंग ओळखत तत्काळ धाडसाने विद्युत पुरवठा बंद केला तसेच गॅस सिलिंडर बाहेर काढला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

यानंतर तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने वेळेत दाखल होऊन चिमणीला लागलेली आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले नाही.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना महिला आघाडी हॉटेलच्या संचालिका आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी सांगितले की, चिमणीला आग लागली असली तरी महिला कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या साहसामुळे वेळेत विद्युत बटण बंद करून गॅस बाहेर काढण्यात आला.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून हॉटेलचेही फारसे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.