बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या बजेटपूर्व बैठकीत ज्येष्ठ पत्रकार महबूब मकानदार यांनी पत्रकारांच्या हितासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
महापालिकेने आपल्या बजेटमध्ये पत्रकारांच्या कल्याणासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
कर्तव्य बजावताना पत्रकारांना अनेक जोखमींना सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना महापालिकेतर्फे आरोग्य व अपघात विमा कवच देण्यात यावे.

पत्रकारांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी महापालिकेने आर्थिक मदतीची किंवा विशेष शिष्यवृत्तीची तरतूद करावी . पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात यावी, दवाखान्यांमध्ये पत्रकारांना प्राधान्याने उपचार मिळावेत अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या.




