belgaum

जगद्विख्यात ‘एमटेक’ कडून एस.पी. ऑटोला अधिकृत वितरक प्रमाणपत्र

0
593
 belgaum

बेळगाव लाईव्ह ; एमटेक इंजिनियर्स ही जगप्रसिद्ध तसेच आशियातील सर्वात मोठी कार ॲक्सेसरीज उत्पादक कंपनी असून, कंपनीने एस. पी. ऑटो ॲक्सेसरीज, बेळगाव यांची 2026 ते 2028 या कालावधीसाठी अधिकृत वितरक म्हणून नियुक्ती केली आहे. यानिमित्ताने एस. पी. ऑटो ॲक्सेसरीजला अधिकृत वितरक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


एस. पी. ऑटो ॲक्सेसरीज ही संस्था 2025 सालापासून एमटेकची वितरक म्हणून यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या विश्वासार्ह सेवेमुळे आणि ग्राहकाभिमुख कामगिरीमुळे त्यांना हा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
एमटेक कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी जेकब आणि रवी कार्तिक यांनी नुकतीच जुना धारवाड रोड, बेळगाव येथील एस. पी. ऑटो ॲक्सेसरीजच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकृत वितरक प्रमाणपत्र सुपूर्त केले.


यावेळी एस. पी. ऑटो ॲक्सेसरीजचे व्यवस्थापकीय संचालक शरद पाटील, तसेच सुहास पाटील आणि प्रतीक पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
एस. पी. ऑटो ॲक्सेसरीज येथे ग्राहकांसाठी कार ॲक्सेसरीजची संपूर्ण श्रेणी उपलब्ध असून, त्यामध्ये सुप्रसिद्ध ब्रँड्ससोबतच ओईएम (OEM) म्हणजेच महिंद्रा, टाटा, सुझुकी यांसारख्या मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत ॲक्सेसरीजचा समावेश आहे. तसेच वाहनांच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक पीपीएफ (Paint Protection Film) सुविधाही येथे उपलब्ध आहे.

 belgaum


सध्या एस. पी. ऑटो ॲक्सेसरीजची आउटलेट्स
जुना धारवाड रोड,
फोर्ट रोड,
गोवावेस कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, बेळगाव
येथे कार्यरत आहेत.
बेळगाव शहरातील कंग्राळ गल्लीतील पाटील कुटुंबाच्या एस. पी. ऑटो या फर्मला मिळालेला हा अधिकृत वितरक दर्जा केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण बेळगाव शहरासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.