बेळगाव लाईव्ह : खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या जिल्हा प्रशासन आणि कर्नाटक सरकार ताकतीनिशी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी राहील अशा शब्दात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पाठराखण पालक मंत्र्यांनी केली आहे.
आज बेळगाव मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विकासकामे आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य कोणतेही काम केलेले नाही. जर त्यांना नोटीस आली, तर आम्ही पूर्ण ताकदीने कायदेशीर उत्तर देऊ. असे नमूद करत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची पाठराखण केली.
पॉक्सो प्रकरणातील आरोपीला जामीन मिळून त्याची सुटका झाल्याच्या घटनेवर त्यांनी प्रशासनाला सतर्क केले. पोलीस विभागाने कोणत्याही वशिल्याला थारा न देता काम करावे. जर या प्रक्रियेत कायदेशीर चूक झाली असेल, तर दोषींना जबाबदार धरले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.
बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता २७५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपूल निर्मितीला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणतीही जमीन संपादित करावी लागणार नाही. दोन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार असून फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये असलेल्या मतभेदांवर लवकरच तोडगा काढला जाईल. या संदर्भात बेंगळुरू येथे तातडीने बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्व आमदारांशी चर्चा करून यावर अंतिम मोहोर उमटवतील. असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.




