पोलिस होमगार्डवर वाहन धडक प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

0
535
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह :ट्रॅफिक पोलिस व होमगार्ड आपले कर्तव्य बजावत असताना, सदर आरोपींनी वन-वे रस्त्यावर रॉंग साईडने स्कूटर चालवून पोलिस व होमगार्डला वाहनाचा धक्का देऊन खाली पाडले. त्यात त्यांना जखमी करून, त्यांचे शर्ट धरून धक्काबुक्की केली तसेच अर्वाच्च शिवीगाळ करून कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

बेळगाव येथील 4थे जे.एम.एफ.सी. न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रत्यक्ष साक्षीदारांतील विसंगतीमुळे सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींची नावे :
• कौस्तुभ संजय काकतीकर, वय : 22 वर्षे, रा. भारतनगर, 3रा क्रॉस, शहापूर, बेळगाव
• कपिल मारुती खन्नूकर, वय : 19 वर्षे, रा. गुरुदेव गल्ली, वडगाव, बेळगाव


टिळकवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खटल्याप्रमाणे, फिर्यादी लोहीत रमेश आरेन्नवर (वय : 24 वर्षे, व्यवसाय : सरकारी नोकरी / पोलिस कॉन्स्टेबल – संचारी दक्षिण पोलिस ठाणे, बेळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी दिनांक 26/12/2017 रोजी आपले कर्तव्य बजावत असताना, बेळगाव टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ होमगार्ड वीरप्पा शिवलिंगप्पा शिगीहळ्ळी यांच्यासोबत ड्युटी करत होते. रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने गोवावेस ते टिळकवाडी रोड हा वन-वे करण्यात आला होता.

 belgaum


संध्याकाळी सुमारे 5.30 वाजता कर्तव्य बजावत असताना, सदर आरोपी टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळ शुक्रवार पेठ सार्वजनिक रस्त्यावर यामाहा कंपनीच्या स्कूटर क्रमांक KA-22 ED-9901 वरून रॉंग साईडने येत होते. त्यावेळी फिर्यादी व होमगार्ड यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फिर्यादीला वाहनाने धडक दिली.


यानंतर फिर्यादी व होमगार्ड यांनी आरोपींना रॉंग साईडने सिग्नल तोडून का आले व अंगावर गाडी का घातली, असे विचारले असता आरोपींनी शिवीगाळ करून शर्ट धरून धक्काबुक्की केली. तसेच होमगार्डवरही धावून जाऊन ड्युटी करत असताना दादागिरी केली. त्यावेळी परिसरातील दुकानदारांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.
या घटनेत फिर्यादीच्या दोन्ही तळहातांना दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम 324, 354, 504 सह कलम 34 तसेच मोटार वाहन कायदा कलम 119, 128(1) सह कलम 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
टिळकवाडी पोलिसांनी आरोपींना अटक करून संपूर्ण तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सात साक्षीदारांची साक्ष व मुद्देमाल तपासण्यात आला. मात्र प्रत्यक्ष साक्षीदारांतील विसंगतीमुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.आरोपींच्या वतीने वकील मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.