बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या मुतगा या छोट्याशा गावात गेल्या काही वर्षांत एक शांत क्रांती घडत आहे. नाव भव्य नाही, इमारती उंच नाहीत… पण ध्येय मात्र अफाट. भावकेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमी—BSA, ज्याला गावकरी प्रेमाने “शौर्यघोष” केंद्र म्हणू लागले आहेत कारण यंदा एक दोन नव्हे तर तब्बल १२ युवकांनी सैन्यदलात प्रवेश मिळवला आहे.
देश सेवेसाठी भावी जवान घडवणाऱ्या मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या बीएसए गटातील प्रशिक्षित 12 युवकांची नुकतीच सैन्य दलात निवड झाल्याबद्दल गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्रातील 12 युवक आता अग्निवीर भरतीच्या माध्यमातून देश सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पद्धतीने या केंद्राने देश सेवा करण्यासाठी आजपर्यंत एकूण 64 जवान सैन्य दलाला दिले आहेत. देश सेवेसाठी भावी जवान घडवणाऱ्या मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीचे मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या बीएसए गटातील प्रशिक्षित 12 युवकांची नुकतीच सैन्य दलात निवड झाल्याबद्दल गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्रातील 12 युवक आता अग्निवीर भरतीच्या माध्यमातून देश सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पद्धतीने या केंद्राने देश सेवा करण्यासाठी आजपर्यंत एकूण 64 जवान सैन्य दलाला दिले आहेत. भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्र गेल्या 2018 पासूनबेळगाव तालुक्यातील शिंदोळी आणि मुतगे गावादरम्यान असलेल्या जागेत सुरू आहे. सदर केंद्रामध्ये भारतीय संरक्षण दलाच्या भू-दल नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांसह सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी जवान घडवले जातात. आपला एक छोटासा प्रयत्न एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो या भावनेने, तसेच कोणाकडून एक पैसाही न घेता निस्वार्थपणे गेल्या 6 वर्षापासून भावेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या मोफत लष्करी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सेवानिवृत्त जवान नामदेव पाटील, किशन पाटील, सिद्धाप्पा पाटील आणि सिद्धलिंग कोलकार हे
देशासाठी सैनिक घडवण्याचे काम अथकपणे करत आहेत. या ठिकाणी सध्या बेळगाव तालुक्यातील विविध गावांमधील एकूण सुमारे 50 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून त्यामध्ये 20 युवतींचा समावेश आहे. केंद्रातील प्रशिक्षणा दरम्यान सैन्य भरतीला आवश्यक धावणे, व्हर्टीकल रोप, मंकीरोप, हँडवर्क वगैरे आवश्यक सर्व शारीरिक तंदुरुस्तीच्या क्रीडा प्रकारांचा दररोज सकाळी 6 ते 8 -8:30 वाजेपर्यंत कसून सराव करून घेतला जातो.

आपल्या केंद्राबद्दल बेळगाव लाईव्हला माहिती देताना प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सेवानिवृत्त जवान नामदेव पाटील यांनी सांगितले की, आम्ही स्वतः देश सेवा केली असल्यामुळे तिचे महत्त्व आम्हाला माहित आहे याखेरीज आम्हाला केंद्र सरकारकडून पुरेसे सेवानिवृत्ती वेतन मिळते. त्यामुळे सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकडून पैसे का घ्यायचे? असा विचार करून आम्ही पैसे न घेता निस्वार्थ भावनेने आणि देशासाठी चांगले सैनिक घडवण्याच्या उद्देशाने गेल्या 2018 मध्ये या प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. या ठिकाणी आम्ही चौघे सेवानिवृत्त जवान प्रशिक्षणार्थींना सैन्य भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण देतो.
आजपर्यंत देशाच्या तिन्ही सैन्यदलांसह बीएसएफ आणि सीआरपीएफमध्ये आम्ही प्रशिक्षित केलेले 64 युवक भरती झाले आहेत. आमच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये फक्त आमच्या गावातीलच नाही तर आसपासच्या गावातील मुले सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. सदर गावांमध्ये कणबर्गी मुचंडी, अष्टे, मास्तमर्डी गावापलीकडील दोन तीन गावे, यरगट्टी, सुळेभावी, मारीहाळ कुडची, हिंडलगा -सुळगा, मच्छे, बेळगाव, हालगा वगैरे गावांचा समावेश आहे असे सांगून आमच्या केंद्रातील तीन मुली सध्या सरकारच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल येथे ज्युडोचे धडे घेत असून त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदके जिंकली आहेत, असे नामदेव पाटील यांनी अभिमानाने सांगितले.



