कंग्राळी क्रिकेट स्पर्धेत के. आर. शेट्टी किंग विजेता

0
675
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथील खास श्री मसणाई देवी यात्रेनिमित्त आयोजित भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेत के. आर. शेट्टी किंग संघाने विजेतेपद पटकावले, तर प्रिशा बबलू स्लमझर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४० पेक्षा अधिक संघांनी सहभाग घेतला.

अंतिम सामन्याचा प्रारंभ सौदर्य पेंटचे आर. आय. पाटील, भाग्योदय सोसायटीचे के. एम. पाटील, कर्नाटक केसरी किसन पाटील, माजी जवान सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील व यशोधन तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

बबलू स्लमझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. के. आर. शेट्टी संघाने निर्धारित ६ षटकांत ४१ धावा केल्या; परंतु बबलू स्लमझर्सला हे लक्ष्य गाठता आले नाही. त्यांनी केवळ २७ धावा केल्या, त्यामुळे के. आर. शेट्टी संघ १४ धावांनी विजयी ठरला.

 belgaum

विजेत्या संघाला रोख रक्कम रु. ५१,१११ व चषक, तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम रु. २५,५५५ व चषक देण्यात आला. ही बक्षिसे योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकारी प्रकाश मोरे, अमित देसाई, महांतेश कोळूचे, रमेश चौगुले व शिवभक्त मनोहर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील मालिकावीर म्हणून टीपू याची निवड झाली. उत्कृष्ठ फलंदाज बबलू गवळी, उत्कृष्ठ गोलंदाज आदित्य वारंग आणि अंतिम सामन्याचा सामनावीर अक्षय पत्रावळी हे ठरले. त्यांना चांदीचे नाणे व चषक सुशांत जाधव, रमेश रेवणकर, सुशांत मुतगेकर, सुरज पाटील, संतोष केंचन्नावर, अधिराज पाटील, पार्थ गिऱ्हाळकर व अर्जुन सनदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किसन पाटील यांनी केले, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठा साम्राज्य सपोर्टर्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.