बेळगावात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

0
719
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या बेळगाव शहरात आणणाऱ्या एका चालकाला उत्पादन शुल्क विभागाने रंगेहाथ पकडले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये दारूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्पादन शुल्क निरीक्षक बेळगाव परिक्षेत्र क्रमांक ३ आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे यडियुरप्पा मार्गावर सापळा रचला.

या कारवाईत मंजुनाथ मल्लगौडा गिडगेरी (वय २६, रा. महाद्वार रोड, बेळगाव) या चालकाला जीए-०९ ए-३८१० क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कारमधून गोवा राज्यात विक्रीसाठी नमूद केलेली विविध प्रकारची एकूण १३८.०६० लिटर दारू कोणताही कायदेशीर परवाना किंवा रसद पावती नसताना अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाने ही संपूर्ण दारू जप्त केली असून जप्त केलेला दारूचा साठा आणि स्विफ्ट कारची एकूण किंमत रुपये ३ लाख ४५ हजार २०० इतकी आहे.

 belgaum

आरोपी चालक मंजुनाथ गिडगेरी याच्यावर कर्नाटक उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हजर राहण्याची नोटीस त्याला देण्यात आली आहे. दरम्यान, या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या स्विफ्ट कारच्या मालकाचा शोध उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.