बेळगाव लाईव्ह: बेळगाव ग्रामीण आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या दोघा बुकिंना काल बुधवारी पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील रोख 7,330 रुपये आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे श्याम भगवानदास गुलाबानी (रा. सिंधी कॉलनी, हिंडलगा बेळगाव) आणि सुनील देवप्पा कांगली (वय 63, आंबेडकरनगर, सदाशिवनगर बेळगाव) अशी आहेत. यापैकी श्याम गुलभावी हा हिंडलगा गावाकडे जाणाऱ्या बॉक्साइड रोड जवळ येईल कच्च्या रस्त्याचे जारी सार्वजनिक ठिकाणी कल्याण ओसी मटक्याचे आकडे घेत होता.
याबाबतची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मप्पा एस जोडट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून श्यामला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील रोख 1760 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या.
दुसरा आरोपी सुनील हा काल बेळगावच्या कणबर्गी तलावा शेजारील सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा अड्डा चालवत होता. याची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकून सुनील याला ताब्यात घेतले.
तसेच त्याच्या जवळील रोख 5,570 रुपये आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या.
याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




