बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डनसमोर गेल्या काही दिवसांपासून बसून असलेल्या एका अनोळखी वृद्धाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाल्याचे समोर आले. कडाक्याची थंडी आणि वृद्धत्वामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि पोलिसांनी दिल्यानंतर माजी महापौर विजय मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह सन्मानपूर्वक हलवण्यासाठी समन्वय साधला.
टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात पाठवण्यात आला आहे.
या कार्यात माजी महापौर विजय मोरे यांच्यासह नगरसेवक नितीन जाधव, पद्मप्रसाद हुली, संतोष दरेकर, संजय प्रभू, सतीश कुगाजी, जयदीप जाधव, शशिकांत आंबेवाडीकर, गौतम श्रॉफ, निसार शमशेर, संजय कोलकर आणि पोलीस कर्मचारी नवीन यांनी सहकार्य केले.





