बेळगाव लाईव्ह : पत्रकारिता, शिक्षण, सहकार आणि समाज सुधारणा या क्षेत्रांत भरीव कार्य करणारे राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्काराचा यंदाचा आठवा सोहळा आहे. या वर्षीचा पुरस्कार पुणे येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कॉ. किशोर ढमाले आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात येत आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृह, शिवस्मारक, खानापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समितीचे ॲड. राजाभाऊ पाटील, प्रा. अनंतराव देसाई, प्रा. आनंद मेणसे, प्रकाश मरगाळे, माजी आमदार दिगंबर पाटील आणि शिवाजी शामराव देसाई यांनी केले आहे.


