बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील ‘काळ्या दिनी’, माळमारुती पोलीस स्टेशनचे सीपीआय जे. एम. कालिमिर्ची यांनी केलेल्या एका कृतीमुळे कन्नड भाषिकांचा मराठी द्वेष उफाळून आला आहे.
सीमालढ्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबत खुद्द सीपीआय कालिमिर्ची यांनी सेल्फी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे मराठी द्वेष्ट्यांमध्ये पोटशूळाची ठिणगी पडली आहे.
सीपीआय जे. एम. कालिमिर्ची हे ‘काळ्या दीना’च्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी बेळगावात तैनात होते. यावेळी म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या निर्भीड आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव थेट पोलीस अधिकाऱ्यांवरही पडल्याचे दिसून आले.
बंदोबस्तादरम्यान, सीपीआय कालिमिर्ची यांनी शुभम शेळके यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण आणि सलगीने संवाद साधला. विशेष म्हणजे, जाताना त्यांनी स्वतःहून आपला मोबाईल काढून सेल्फी घेतली. हि सेल्फी सोशल मीडियावर इतकी वायरल झाली कि याचा पोटशूळ मराठी द्वेष्ट्यांमध्ये उठला.
एकंदर परिस्थितीची माहिती घेताना ही बाब समोर आली की शुक्रवारी पासून शेळके यांच्या मागावर होते परंतु शेळके त्यांच्यापासून रिचेबल होत नव्हते अखेर शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात काळ्या दिनाच्या सायकल फेरीच्या सुरुवातील पोलिस निरीक्षकांना त्यांची गाठ झाली याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी त्या पोलिस निरीक्षकांनी सेल्फी काढून वरिष्ठांकडे पाठवला असावा परंतु परिस्थितीचा विपर्यास केला गेला आणि तुफान व्हायरल झालेल्या सेल्फिनी दोन वेगवेगळ्या उद्देशांनी वापरल्या गेल्याने समाजात मात्र वेगवेगळे संदेश जात गोंधळ उडाला.
हा सेल्फी आता बेळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे मराठी भाषिकांचा अभूतपूर्व यशस्वी झालेला मूक मोर्चा, आणि दुसरीकडे काळ्या दिनाला विरोध करणारे कन्नड संघटनेचे कार्यकर्ते आणि अशातच कर्नाटक प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानेच थेटसीमा आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यासोबत मैत्रीपूर्ण छायाचित्र काढल्यामुळे कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचा तीव्र जळफळाट होत आहे.
सेल्फी प्रकरणामुळे माळमारुतीचे सीपीआय जे. एम. कालिमिर्ची वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, त्यांच्या या कृतीवर वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सीपीआय यांच्यावर कारवाईचा इशारा देत तूर्तास कन्नड संघटनांना शांत केले आहे.




