बेळगाव लाईव्ह : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट केंद्र, बेळगाव येथे डीएससी (Defence Security Corps) एनसीओ भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली १७ ते १८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार असून, ही भरती माजी सैनिक (Ex-Servicemen of Regular Army/TA) यांच्यासाठी आहे.
या भरतीत सोल्जर जनरल ड्युटी (GD) आणि सोल्जर क्लर्क (SD) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पात्रतेच्या अटी :
• उमेदवार फक्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे माजी सैनिक असावेत.
• चरित्र ‘Exemplary’ किंवा ‘Very Good’ असणे आवश्यक.
• शेवटच्या पाच वर्षांत Red Ink Entry नसावी.
• किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी.
• पुर्ननोंदणीचा कालावधी :
• सोल्जर GD साठी — सेवानिवृत्तीनंतर २ वर्षांच्या आत
• सोल्जर क्लर्क साठी — सेवानिवृत्तीनंतर ५ वर्षांच्या आत
• शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक आणि त्यापुढील (नॉन-मॅट्रिकसाठी ACE-III).
• वैद्यकीय श्रेणी (Medical Category) : SHAPE-I
• वयोमर्यादा :
• सोल्जर GD साठी ४६ वर्षांखाली
• सोल्जर क्लर्कसाठी ४८ वर्षांखाली.
आवश्यक कागदपत्रे :
डिस्चार्ज बुक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, राहिवासी दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, कौटुंबिक फोटो, आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, १५ पासपोर्ट आकाराचे फोटो, पोलिस सत्यापन प्रमाणपत्र, PPO, तसेच TA कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
रॅलीचा तपशील :
उमेदवारांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता (0800 hrs) मराठा LIRC, बेळगाव येथे उपस्थित राहून भरती रॅलीत सहभाग घ्यावा.
📅 दिनांक: १७ ते १८ नोव्हेंबर २०२५
📍 स्थळ: मराठा LIRC, बेळगाव
#BelgaumLive #BelgaumUpdates #DSCRecruitment #MarathaLightInfantry #DefenceJobs #BelagaviNews #ArmyRecruitment #IndianArmy #Belagavi #DefenceRally



