belgaum

१३ डिसेंबरला १४ तालुक्यांमध्ये एकाच वेळी लोक अदालत

0
47
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगावचे प्रधान आणि जिल्हा न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी सांगितले की, १३ डिसेंबर रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. याचबरोबर, वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या ट्रॅफिक चलनावर ५० टक्के दंडाची सवलत भरण्यासाठी शहरात विविध ठिकाणी काउंटर स्थापन केले जातील.

आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १३ डिसेंबर रोजी एकाच वेळी १४ तालुका केंद्रांवरील न्यायालय संकुलात या वर्षाची चौथी आणि शेवटची लोक अदालत होणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली आणि दावा दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे चिन्हांकित करून, ती लोक अदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

चेक बाऊन्स आणि पोलिस प्रकरणांवरही समेटाने निर्णय घेतला जाईल. तिसऱ्या महत्त्वाच्या निर्णयानुसार, ट्रॅफिक चलन प्रकरणांमध्ये ५० टक्के दंडाची सवलत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. १२ डिसेंबरपर्यंत या सवलतीसह दंडाची रक्कम भरून प्रकरणे निकाली काढण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन आणि पोलिस विभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी विशेष काउंटर उघडले जातील. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 belgaum

मागील लोक अदालतीमध्ये एकूण १४,५०० प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. यंदा २० हजार तडजोडीयोग्य प्रकरणे चिन्हांकित करण्यात आली असून, त्यापैकी १५ ते १६ हजार प्रकरणे निकाली निघण्याची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी सुमारे दीड लाख खटले दाखल होण्यापूर्वीचे (प्री-लिटिगेशन) प्रकरणे निकाली काढली होती. यावर्षी त्याहून अधिक प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.