बेळगाव लाईव्ह : शनिवारी रात्री होसुर परिसरात युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
अटक झालेल्या आरोपीचे नाव सागर पांडुरंग सालगुडे (वय 37, रा. होसुर बसवण गल्ली, शहापूर, बेळगाव) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री किरकोळ वादातून प्रसाद जाधव या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात प्रसाद जाधव गंभीर जखमी झाला. आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा हल्ला केल्याची तक्रार जखमीच्या पत्नीने शहापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 114/2025, कलम 109(1), 352 बीएनएस-2023 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची रचना करून आरोपीचा शोध घेण्यात आला व 09 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.




