बेळगाव लाईव्ह : सुवर्ण सौध येथे 08 डिसेंबर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली आहे.
परमेश्वर यांनी सांगितले की येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी 6,000 पोलिस कर्मचार्यांची तैनाती करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी स्पष्ट केले की यंदा विविध संघटनांच्या अपेक्षित आंदोलनांमुळे पोलिस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे.
त्यांनी पुढे सांगितले की पोलिस कर्मचार्यांच्या अन्न व निवास व्यवस्था पूर्णपणे करण्यात आल्या आहेत.
आंतरिक आरक्षणासंदर्भातील वादामुळे पोलिस भरती प्रक्रियेत झालेला विलंब दूर झाला असून 545 उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, तर अजून 600 PSI पदांची भरती लवकरच होणार आहे.
मंत्र्यांनी हेही सांगितले की 15,000 पोलिस कॉन्स्टेबल पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असून, पोलीस विभागाने जुगार, मटका यांसारख्या अवैध व्यवसायांवर आळा घालावा, असे निर्देश दिले आहेत.





