बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या गुडशेड रोड रेल्वे कॉर्डर्स जवळील उद्यानाशेजारी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका युवकाला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील 7.56 ग्रॅम हेराॅइन पावडरसह एकूण 25800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मोहम्मव्दाहिद मुल्ला (वय 27, 12 वा क्रॉस उज्वलनगर, बेळगाव) असे आहे. सदर युवक गुडशेड रोड येथील रेल्वे कॉर्टर्स जवळील नेताजी सुभाषचंद्र बोस चिल्ड्रन्स पार्क या उद्यानाशेजारी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या मादक पदार्थाची विक्री करत होता.
याबाबतची माहिती मिळताच सीसीबी बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री छापा टाकून त्याला रंगेहात पकडले.
तसेच त्याच्याकडील बाजारभावानुसार 15800 रुपये किमतीची 7.56 ग्रॅम हेराॅइन पावडर आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 25800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सीसीबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


