बेळगाव लाईव्ह :हालगा (ता. जि. बेळगाव) गावातील विजयनगर तलावाजवळील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून बागेवाडी पोलिसांनी 5 जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील रोख 5000 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सचिन सदानंद अनगोळकर (वय 45, रा. वडगाव बेळगाव), प्रणय अनंत गोरल (वय 22, रा. भारत गल्ली खानापूर बेळगाव), किशोर तानाजी सुतार (वय 47, येळ्ळूर रोड, वडगाव बेळगाव), प्रथमेश गजानन यादव (वय 25, रा. मीरापूर गल्ली, शहापूर बेळगाव) आणि विश्वनाथ रवी गोटडकी (वय 29, रा. भांदूर गल्ली बेळगाव) अशी आहेत.
हे सर्वजण काल शुक्रवारी हालगा येथील विजयनगर तलावात जवळील सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी अचानक धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील रोख 5 हजार रुपये आणि 52 पत्त्यांसह जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी बागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


