belgaum

पोलिसांची अत्याधुनिक डिजिटल वायरलेस सिस्टीम

0
99
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयात संपर्क साधनांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली असून, पूर्वी वापरात असलेली अॅनालॉग वायरलेस प्रणाली आता अत्याधुनिक डिजिटल वायरलेस संपर्क जाळ्याने बदलण्यात आली आहे. यामुळे पोलिस पथकांमधील संपर्क आणखी मजबूत होऊन तातडीच्या वेळेस माहितीची देवाणघेवाण जलद व अचूक होणार आहे.

यासाठी शहरातील विविध उंच ठिकाणी एकूण 5 वायरलेस पुन:प्रसारण केंद्रे (Repeater Stations) स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून पोलिसांना स्पष्ट आणि अखंड संवाद साधणे सोपे झाले आहे.

वितरित उपकरणांमध्ये खालील साधनांचा समावेश:
• 35 स्टॅटिक वायरलेस सेट
• 180 मोबाइल वायरलेस सेट
• 8 रिपीटर्स
• 563 वॉकी-टॉकी
या सर्व उपकरणांच्या कार्यक्षम समन्वयातून बेलगाव शहरात डिजिटल वायरलेस संपर्क प्रणाली अधिकृतरित्या कार्यरत झाली आहे.

 belgaum

पोलिसांची प्रतिसाद क्षमता वाढण्यास आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास या नव्या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रणालीमुळे मिळणारे फायदे:
• संदेशवहन जलद आणि स्पष्ट
• गोंधळ किंवा हस्तक्षेपाशिवाय संवाद
• तातडीच्या कारवाईत समन्वय अधिक मजबूत
• आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्पर उपस्थिती
नवीन डिजिटल प्रणालीमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि शहरातील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.