बेळगाव लाईव्ह : आपले संस्थापक महंत स्वामी यांच्या आशीर्वादाची परंपरा कायम ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुरगोड मठाला अन्नदासोह (अन्नदान) कार्यासाठी मोठा निधी दिला आहे. आम. भालचंद्र जारकीहोळी आणि सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार बँकेने हा १० लाख रुपयांचा धनादेश मठाकडे सुपूर्द केला.
डीसीसी बँकेची स्थापना मुरगोड मठाचे महंत स्वामी यांच्या पावन पदस्पर्शाने झाली होती. हा आशीर्वाद संस्थेवर सदैव राहावा, या पवित्र उद्देशाने बँक दरवर्षी मठाला अन्नदानासाठी निधी देते.
यानुसार, यंदाही आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनानुसार, नवनिर्वाचित अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने अन्नदासोहळासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश मठाला सुपूर्द केला.
हा धनादेश सुपूर्द करताना बँकेचे संचालक अरविंद पाटील, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह बँकेच्या अन्य संचालकांची उपस्थिती होती. मठाच्या माध्यमातून चालणाऱ्या अन्नदानाच्या या महत्त्वपूर्ण कार्याला बँकेने दिलेल्या या भरीव मदतीमुळे अन्नदान परंपरेला मोठा हातभार लागला आहे.


