बेळगाव लाईव्ह : निवडणूक काळात विशेष मतदार यादी पुनरिक्षण आणि स्वीप उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्वीप उपक्रमांद्वारे मतदार यादी पुनरिक्षणबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करावी, असे निर्देश राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विशेष समग्र पुनरिक्षण तयारी, एस.आय.आर/एस.एस.आर. ची तयारी तसेच स्वीप/ई.एल.सी. संबंधित कार्यक्रमांविषयी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पी. एस. वस्त्रद यांनी ‘विशेष मतदार यादी पुनरिक्षण म्हणजे काय?’ आणि ‘मतदार यादी पुनरिक्षण का आवश्यक आहे?’ याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. पुनरिक्षणसंबंधी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बॅनर, पत्रके आणि विविध उपक्रमांद्वारे स्वीप कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील स्वीप आणि ई.एल.सी. संबंधी शाळा-महाविद्यालयांच्या माहितीची नोंद राज्य नोडल अधिकाऱ्यांकडे दिली.
या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी एन. बंगारेप्पण्णावर, महानगरपालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी आणि उदयकुमार बी. टी., डी.डी.पी.यू. एम. एम. कांबळे, जिल्हा पी.यू. नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, डी.डी.पी.आय. लीलावती हिरेमठ, डी.एच.ओ. डॉ. आय. पी. गडाद यांच्यासह अन्य जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




