बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील तीन सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी, राखीव निधी आणि गहाण ठेवलेला चीजवस्तू परत मिळवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कन्नड साहित्य भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील द बेळगाव डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोवर्स, परचेसर्स, सेलर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड फोर्ट रोड बेळगाव, त्याचप्रमाणे बेळगाव होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कामत गल्ली, बेळगाव आणि कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी, महाद्वार रोड बेळगाव या संस्थाच्या बंद असल्याने
त्यामुळे या संस्थांमध्ये ठेवीच्या स्वरूपात पैशाची गुंतवणूक करणारे आणि मौल्यवान चीजवस्तू गहाणवट ठेवणाऱ्या भागधारक, सदस्य अडचणीत आले आहेत.
या सर्वांवर ओढवलेल्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, तसेच ठेवी, राखीव निधी आणि गहाण ठेवलेला चीजवस्तू परत मिळवण्यासाठी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता कन्नड साहित्य भवन येथे खास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उपरोक्त संस्थांशी संबंधित भागधारक आणि सदस्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




