बेळगाव लाईव्ह : अनेक वर्ष रेंगाळत पडलेला बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारतर्फे अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात दावा मेन्शन केला होता. त्यानुसार सोमवारी याचिका सुनावणीसाठी नियोजित होती पण याचिकेचा क्रमांक ८०१ असल्याने तो पटलावर आली नाही मात्र पुढील सुनावणीची तारीख जाहीर झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरीष्ठ वकील वैद्यनाथन व वकील शिवाजीराव जाधव यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न दावा लवकरात लवकर सुनावणी साठी घ्यावा याबाबत न्यायालयात विनंती केली त्यानुसार न्यायमूर्ती संजीवकुमार यांनी सदर विनंती मान्य करून दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सुनावणी ची तारीख निश्चित केली आहे.
सदर दिवशी मूळ दाव्याचीच सुनावणी सुरू होणार आहे.
या खटल्याची मागील २०२३ मध्ये सुनावणी झाली होती. पण, त्यावेळीही कर्नाटकाचे न्यायमूर्ती त्रिसदस्यीय खंडपीठात असल्यामुळे सुनावणी झाली नव्हती आता पुढील वर्षी 21 जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र सरकारने नव्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढ्याचा पाठपुरावा सुरू झाला आहे असे समिती नेते प्रकाश मरगाळे यांनी म्हटले आहे.


