बेळगाव लाईव्ह : सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि सहकाऱ्यांच्या प्रसंगावधान केलेल्या प्रयत्नाने संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
मंगळवारी रात्री बेळगाव बसवान गल्ली येथे उघड्यावर वीजेची तार पडल्याची माहिती अवधूत आणि सहकाऱ्यांना मिळाली.त्यांनी
तात्काळ सामाजिक कार्यकरते पद्मप्रसाद हुली (एच ई आर एफ) यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.
त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीची पाहणी करून,सदर माहिती (के ई बी) कार्यालय आणि खडेबाजार पोलिस स्टेशनला कळवीली.या नंतर संबंधित विभागाच्या इस्कॉन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून धोकादायक स्थितीतील ती विजेची तार तोडली. त्यामुळे दिवाळीत एक मोठा ऐन दिवाळीत एक मोठा अनर्थ टळला.
अशाच प्रकारच्या धोकादायक स्थितीतील उघड्यावरील विजेच्या तारा शहर उपनगरातील अनेक भागात आहेत या धोकादायक विद्युततारांची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती आवश्यक आहे.





