बेळगाव लाईव्ह :कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील बलभीम युवक संघ व ग्रामस्थ आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवार दि.28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले आले.
बलभीम वाचनालयाच्या सभागृहात मंगळवार (दि.14) सायंकाळी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष शिवाजी मुरकुटे होते.
माजी ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी स्वागत केले. यावेळी यावर्षीचे संमेलन 28 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संमेलन नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. साहित्यिक, वक्ते, कवी यांना आमंत्रित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी , एम. बी. गुरव, जी. जी. पाटील, पी. एल. गुरव, दत्ता कांबळे, बाळाराम धामणेकर, महादेव गुरव यांनी सूचना मांडल्या. बैठकीला राम गुरव, मोहन शिंदे, राजाराम राजगोळकर, मारुती पाटील,बाबाजी गुरव सुहास गुरव, उमेश गुरव, लखन धामणेकर, महेश पाटील, दीपक मराठे, नागेश बोकमूरकर विजय मजुकर गजू हुलजी सुशांत शिंदे विनायक जांबोटकर आणि आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.



