बेळगाव लाईव्ह : अवैध दारू विक्री विरोधात बेळगाव पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली असून दारू विकणाऱ्याला अटक करत त्यांच्याजवळून दारू देखील जप्त केली आहे. मारीहाळ आणि उद्यमबाग पोलिसांकडून अवैध दारूविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
मारिहाळ पोलिसांनी हनमंत भीमप्प तळगेरी (वय 38 वर्षे)
रा. हण्णिकेरी, ता. बैलहोंगल, सध्या पंतनगर, ता. व जि. बेळगाव यांच्यावर कारवाई केली आहे.
बेळगाव तालुक्यातील मारिहाळ पोलिसांनी अबकारी कायद्यान्वये कारवाई करत 23 ऑक्टोंबर रोजी पंतनगर येथील एस. के. गार्डन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूचे सेवन करण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर,
मन्जुनाथ हुलकुंद, पी.एस.आय., मारिहाळ पोलीस ठाणे व त्यांच्या पथकाने छापा टाकून दारू जप्त केली आहे. त्यात बेंगळुरू व्हिस्की कंपनीचे 180 मिलीचे एक टेट्रापॅक (किंमत ₹80/-) ओरिजिनल चॉइस चार 180 मिलीचे दोन टेट्रापॅक (किंमत ₹190/-)रिकामे 5 ओरिजिनल चॉइस सॅशे, ग्लास व पाण्याच्या बाटल्या असे एकूण ₹1270/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध मारिहळ पोलीस ठाणे गुन्हा क्र. 129/2025 अबकारी कायदा 1965 च्या कलम 15(अ), 32(3) अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू आहे.
उद्योगबाग पोलिसांकडून अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक करून त्याच्याकडून दारू जप्त केली आहे.
पोलिसांनी यल्लप्प लगमप्प नायक (वय 46 वर्षे) रा. गुटगुडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव यांना
स्वतःच्या फायद्यासाठी उद्यमबाग परिसरात, अशोक आयर्न प्लांट नं. 1 जवळील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला परवाना नसताना अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर,
किरण सिन्नी होनकट्टी, पी.एस.आय., उद्योगबाग पोलीस ठाणे व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीकडून ₹1000/- किमतीची 4.5 लिटर कच्ची दारू भरलेली कॅन
₹180/- रोख रक्कम अशा एकूण ₹1180/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरुद्ध उद्योगबाग पोलीस ठाणे गुन्हा क्र. 57/2025 अबकारी कायदा 1965 च्या कलम 32, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांत एकूण 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ₹180/- रोख रक्कम व ₹1270/- किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईसाठी छापा टाकणाऱ्या पी.एस.आय. आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे पोलीस आयुक्त बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.






