बेळगाव लाईव्ह :नशेच्या पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी बेळगाव शहर पोलीस दलाने विशेष मोहीम राबवली असून, सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांवर NDPS कायदा कलम 27(b) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
माळमारुती पोलीस स्थानकात संशयित आरोपी सोहेल सुबानी पिरजादे (25), रा. जनता प्लॉट, श्रीनगर, बेळगाव, हा श्रीनगर गार्डन परिसरात संशयास्पदरीत्या वागताना आढळला. चौकशीत त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर गुन्हा क्रमांक 201/2025 NDPS Act कलम 27(b) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.टिळकवाडी पोलीस स्थानकात संशयित आरोपी राहुल शिवाजी जालगार (25), रा. खडेबाजार, बेळगाव, हा बुधवार पेठ साईन पार्कजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वागताना सापडला. चौकशीत त्याने नशेचे पदार्थ सेवन केल्याचे आढळल्याने गुन्हा क्रमांक 109/2025 NDPS Act कलम 27(b) अंतर्गत नोंद झाला आहे.
हिरेबागेवाडी पोलीस स्थानक परिसरात
आरोपी रामप्पा शिवनप्पा नागनूर (63), रा. कुकोडोळी, बेळगाव तालुका, हा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वागताना आढळला. चौकशीत त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा क्रमांक 175/2025 NDPS Act कलम 27(b) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.उद्यमबाग पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात
आरोपी आकाश मधुकर गवांकर (25), रा. हवलानगर, मच्छे, बेळगाव, हा ब्रह्मनगर क्रॉस परिसरात संशयास्पदरीत्या वागताना सापडला. चौकशीत त्याने गांजा सेवन केल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर गुन्हा क्रमांक 58/2025 NDPS Act कलम 27(b) अंतर्गत नोंद झाला आहे.
काकती पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात संशयित
आरोपी रोहित रेवणी होळी (23), रा. काकती गाव, बेळगाव, हा आर.के. ढाबा जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना पकडला गेला. त्याच्यावर गुन्हा क्रमांक 226/2025 NDPS Act कलम 27(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरीलप्रमाणे एकूण ५ स्वतंत्र प्रकरणांमध्ये ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचार्यांच्या कार्याचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.


