बेळगाव लाईव्ह : भारतीय जनता पार्टी, बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव महानगर विधानसभा मतदारसंघातील सर्व हिंदू बांधवांसाठी आज, गुरुवार सकाळी २५ हजार सुगंधी उटण्याची पाकिटे मोफत वितरीत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. भाजप बेळगाव ग्रामीणचे नेते धनंजय जाधव यांच्या वतीने हा उपक्रम चालवण्यात आला.
दीपावली हा हिंदूंचा सर्वात मोठा सण असून, तो ‘अंधारातून प्रकाशाकडे’ नेणारा उत्सव आहे. ‘अभ्यंग स्नाना’शिवाय हा सण पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच या स्नानासाठी सुगंधी उटणे आवश्यक असते. घरातील माता-भगिनी खोबरेल तेल किंवा सुगंधी तेलात उटणे मिसळून पहाटे घरातील लहान-थोरांना लावून, त्यांची आरती करून त्यांना अभ्यंग स्नान घालतात.
या उटण्याचे महत्त्व ओळखून भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव महानगर विधानसभा क्षेत्रातील सर्व हिंदू बांधवांना आज गुरुवार सकाळी सुगंधी उटण्याची २५,००० पाकिटे मोफत वितरित करण्यात आली.
तसेच, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या. भाजप बेळगाव ग्रामीणचे नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.



