बेळगाव लाईव्ह :राज्यात सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक अर्थात जातीनिहाय जनगणती करणाऱ्या सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना गणती संपेपर्यंत त्यांच्या दैनंदिन शालेय कामकाजातून वगळण्यात आले असल्याचा आदेश शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी सूचना करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा यंदाचा एसएसएलसी निकाल अधिक चांगला लागावा यासाठी शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे,
तथापि ज्या शिक्षकांची जातीनिहाय जनगणनेसाठी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासाठी या कार्यशाळा सक्तीच्या नाहीत.
या खेरीज जनगणती समाप्त होईपर्यंत संबंधित शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन शालेय कामकाजातून मुक्त करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्याने आपल्या आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.


