बेळगाव लाईव्ह: अपार्टमेंटमधील पार्किंगमधून कार बाहेर काढताना सिक्युरिटी गार्डला धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी न्यू गुड्सशेड रोड परिसरात ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
नागेश शटुप्पा देवजी (वय ५६) राहणार माळी गल्ली असे त्या दुर्दैवी गार्डचे नाव आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३०
वाजण्याच्या सुमारास कारची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
टेगिनकेरा गल्ली येथील राजगुरु युवक मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कामत गल्ली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यासंबंधी कार चालविणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


