बेळगाव लाईव्ह : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडली आहे.मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे आहे.
याबाबत समजलेले अधिक माहितीनुसार गणेश विसर्जना दिवशी मयत युवक आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ गेला होता. त्याला पोहता येत असल्याने तो नदीपात्रात उतरला; मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि भोवऱ्यात अडकल्याने तो वाहत जाऊन बुडाला, अशी माहिती समोर आली आहे.
यडोगा (ता. खानापूर) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली.






घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, यडोगा गावात सार्वजनिक गणेश विसर्जन उत्सव साध्या पद्धतीने पार पाडण्यात येत आहे.
मृतकाच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


