बेळगाव लाईव्ह: श्री गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान रहदारीत होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी रहदारी मार्ग बदलांची योजना जाहीर केली आहे. मिरवणूक दरम्यान शहरात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक बंद असणार आहे.
मिरवणुकीचा मार्ग: नरगुंदकर भावे चौकापासून सुरू होणारी मुख्य मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, एन.डी.बूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस), रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर फ्लाय ओव्हरमार्गे कपिलेश्वर तलाव येथे संपेल.
रहदारी मार्गात बदल:
· ६ सप्टेंबर दुपारी २:०० वाजतापासून ७ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत हे बदल अंमलात असतील.
· खानापूर, काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, जिजामाता सर्कल, जुना पीबी रोड यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.




· मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद राहील.
· शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांचे प्रवेशनिषिद्ध करण्यात आले आहे.
सूचना: पोलिसांनीनागरिकांना मिरवणुकीदरम्यान पर्यायी मार्ग वापरण्याची आणि सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याची विनंती केली आहे. अधिक माहितीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.





