बेळगाव लाईव्ह :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) पक्षातर्फे सुंदर श्री गणेश मुर्ती स्पर्धा यावर्षीही आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यावर्षी प्रथमच सामायिक महाविजेता पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, अष्टविनायक नगर, येळ्ळूर रोड, वडगांव-बेळगांव या मंडळाने पटकावला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) पक्षाच्या सुंदर श्री गणेश मुर्ती स्पर्धेचा स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव दक्षिण विभाग : प्रथम क्रमांक -श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्ली, अनगोळ. द्वितीय क्रमांक -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, रघुनाथ पेठ, अनगोळ.
तृतीय क्रमांक -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, धारवाड रोड, संभाजी रोड, जोशीमळा, पाटील गल्ली, ओमनगर, खासबाग, बेळगांव. चतुर्थ क्रमांक -ॐकार तरुण मित्र मंडळ, पवार गल्ली, शहापूर. पाचवा क्रमांक -भरत युवक मंडळ, जोशी गल्ली, शहापूर.
बेळगाव उत्तर विभाग : प्रथम क्रमांक -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, ध. संभाजी गल्ली, महाद्वार रोड. द्वितीय क्रमांक -शिवशाही युवक मंडळ, श्री छत्रपती शिवाजी नगर गल्ली नं. 5, 6, 7. तृतीय क्रमांक -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री छत्रपती शिवाजीनगर (1ला क्रॉस, 2रा क्रॉस, 4था क्रॉस, 5 वा क्रॉस, 6 वा क्रॉस). चतुर्थ क्रमांक -धर्मवीर संभाजी युवक मंडळ, ताशिलदार गल्ली, बेळगांव.










पाचवा क्रमांक -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, बेळगांव. सामायिक महाविजेता : सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, अष्टविनायक नगर, येळ्ळूर रोड, वडगांव-बेळगांव.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अष्टविनायक नगर येळ्ळूर रोड, वडगाव येथे मोठ्या थाटात पार पडला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रदीप सुतार, मयुरेश काकतकर, अमर कडगावकर, महिपाल ईतापाचे आदींसह विविध सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि गणेश भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.




