बेळगाव लाईव्ह :कर्नाटक शिक्षण खात्याने राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी दसऱ्याची सुट्टी जाहीर केली असून सर्व शाळांना येत्या 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुट्टी मिळणार आहे.
राज्य शिक्षण खात्याने कर्नाटकातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत दसऱ्याच्या सुट्टी पाळतील, असे जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना एकूण 18 दिवसांची सुट्टी मिळेल. शिक्षण खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, शैक्षणिक उपक्रम आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक प्रथेप्रमाणे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले आहे.
या अनुषंगाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी दसऱ्याच्या सुट्ट्या 20 सप्टेंबरपासून सुरू होऊन 7 ऑक्टोबरपर्यंत चालतील. त्यानंतर शैक्षणिक वर्षाचा दुसरा टप्पा 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 एप्रिल 2026 पर्यंत चालेल.
हे वेळापत्रक सर्व शाळांसोबत आधीच शेअर केले गेले होते आणि त्यानुसार आता अधिकृतपणे सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, असेही शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.




