belgaum

… अखेर सापडली अनगोळ येथून बेपत्ता झालेली ‘ती’ दोन मुले

0
60
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अनगोळ, शिवशक्तीनगर येथून काल शुक्रवारी दुपारी बेपत्ता झालेली अनमोल शंकर परियार व कार्तिक अर्जुन परियार ही दोन अल्पवयीन मुले पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील श्री गणेश चौकात सापडली असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात आले आहे.

एका ऑटो रिक्षा चालकाची सतर्कता आणि चेतन शिवाप्पा कोमन्नावर या अवघ्या 12 वर्षाच्या मुलाने केलेल्या मदतीमुळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि टिळकवाडी पोलिसांच्या प्रयत्नांनी ऐन सणासुदीच्या काळात चिंतित झालेल्या हरवलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, अनगोळ शिवशक्तीनगर येथून काल शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून अनमोल शंकर परियार (वय 10 वर्षे) व कार्तिक अर्जुन परियार (वय 8 वर्षे) ही दोन मुले गणपती बघायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर आज शनिवारी सकाळी दुसरा दिवस उजाडला तरी दोघेही घरी न परतल्यामुळे चिंतीत झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याकडे मदत मागितली होती. सामाजिक कार्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गुंजटकर यांनी लागलीच समाज माध्यमांवरील प्रसारमाध्यमांच्या मदतीने दोन मुले बेपत्ता झाल्याची माहिती प्रसिद्ध करण्याबरोबरच मुलांचे शोध कार्य हाती घेतले. पोलिसांनाही बेपत्ता मुलांबरोबर कळविण्यात आले. बेळगाव लाईव्हने देखील या मुलांबाबतचे वृत्त सचित्र प्रसिद्ध केले होते. समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या हे वृत्त पाहून एका ऑटो रिक्षा चालकाने विनायक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधून छायाचित्रातील मुलांना आपण गोडसेवाडी येथे सोडले असल्याची माहिती दिली. सदरची माहिती मिळताच माजी नगरसेवक गुंजटकर यांनी पोलिसांना दिली. तेव्हा लागलीच बेपत्ता मुलांचा शोधार्थ निघालेल्या उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोडसेवाडी येथे दोन लहान मुले आढळली. पोलिसांनी त्या मुलांकडे हरवलेल्या मुलांचे फोटो दाखवून चौकशी केली असता त्यांनी संबंधित मुलांना आपण पाहिले नसल्याचे सांगितले.

 belgaum

दरम्यान माजी नगरसेवक गुंजटकर यांनी मुलांचे पालक व पोलिसांसमवेत गोडसेवाडी गाठली. तोपर्यंत पोलिसांनी ज्या मुलांकडे चौकशी केली होती त्या मुलांपैकी चेतन शिवाप्पा कोमन्नावर याला बेपत्ता झालेली मुले पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील श्री गणेश चौकातील मंडपाच्या ठिकाणी आढळून येताच त्याने तेथील होमगार्डला त्या मुलांबद्दल माहिती दिली.

z ganesh
z ganesh
z ganesh
z ganesh
z ganesh
z ganesh

तेंव्हा त्या मुलांना सोबत घेऊन संबंधित मायाप्पा सनदी हा होमगार्ड पोलिसांकडे जाण्याच्या तयारीत असताना विनायक गुंजटकर हे मुलांचे पालक व पोलिसांसमवेत तेथे दाखल झाले. त्यानंतर सुखरूप सापडलेल्या दोन्ही मुलांना उद्यमबाग पोलीस ठाण्यातील कागदोपत्री कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.