बेळगावची लेक बनली इंडियन टीमची ज्युडो कोच

0
32
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खेळाडू विविध खेळात यश मिळवतच असतात बेळगाव तालुक्यातील चंदगड (अष्टे) गावची कन्या आता भारतीय ज्युडो कोच बनली आहे.

कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो प्रशिक्षिका, एकलव्य पुरस्कार विजेत्या रोहिणी पाटील यांची जकार्ता (इंडोनेशिया) येथे येत्या बुधवार दि. 10 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या कनिष्ठ आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप -2025 साठी भारतीय ज्युडो संघाच्या प्रशिक्षक म्हणून अभिनंदन निवड झाली आहे.

जकार्ता, इंडोनेशिया येथे दि. 10 ते दि. 15 सप्टेंबर 2025 दरम्यान आगामी कनिष्ठ आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप -2025 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या कनिष्ठ ज्युडो संघाच्या प्रशिक्षक म्हणून बेळगावच्या रोहिणी पाटील यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.

 belgaum

ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारत सरकारच्या सहमतीने ही नियुक्ती केली आहे. रोहिणी पाटील 2024 पासून भारतीय ज्युडो संघात सातत्याने योगदान देत आहेत. त्या यापूर्वी पुढील स्पर्धांसाठी प्रशिक्षक म्हणून समर्थपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे.

1) अकताऊ, (कझाकस्तान) येथील वरिष्ठ आशियाई ज्युडो ओपन चॅम्पियनशिप 2024, 2) वरिष्ठ आशियाई ज्युडो ओपन चॅम्पियनशिप हाँगकाँग (चीन) 2025. 3) कनिष्ठ आशियाई ज्युडो कप स्पर्धा -2025 चायनीज तैपेई (तैवान), आणि आता कनिष्ठ आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप 2025 इंडोनेशिया.

रोहिणी पाटील यांनी 2003 मध्ये तिचा ज्युडो क्रीडा प्रकारातील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असून त्या आता 2025 -26 मध्ये म्हणजे 22 वर्षे या खेळाच्या उत्कर्षासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत. त्यांनी 2019 मध्ये ज्युडो प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एनआयएस डिप्लोमा (2018-19 बॅच) धारक असलेल्या रोहिणी पाटील यांनी पटियाला (पंजाब) येथून एम. ए. एम. फिल पदवी संपादन केली आहे.

ज्युडो खेळाडू म्हणून त्यांनी मिळवलेले यश तितकेच प्रभावी असून ते पुढील प्रमाणे आहे. दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक, राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक, वरिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, अनेक वेळा राज्यस्तरीय सुवर्णपदक. प्रतिष्ठित एकलव्य पुरस्कार पुरस्काराच्या मानकरी. डॅन ब्लॅक बेल्टच्या मानकरी असणाऱ्या रोहिणी यांनी भारतीय ज्युडो फेडरेशनने घेतलेल्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय ज्युडो फेडरेशनने त्यांना ‘अ’ दर्जा राष्ट्रीय पंच म्हणून प्रमाणित केले आहे

. सध्या रोहिणी पाटील या बेळगाव येथील कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) स्पोर्ट्स हॉस्टेलमधील इनडोअर हॉलमध्ये अनेक युवा ज्युडो खेळाडू घडविण्याचे काम करत असून त्यांना आगामी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करत आहेत. डीवायईएस उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांना सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत असून उपयोग निवडीबद्दल रोहिणी यांचे क्रीडाक्षेत्र सह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.