belgaum

महाराष्ट्र राज्य फलक : उद्या चौथ्या केस चा निकाल

0
45
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावात ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल उद्या, ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. या निकालाकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

येळ्ळूर येथील वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली होती आणि त्यांच्यावर सात गुन्हे दाखल केले होते. यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

खटला क्रमांक १२५ मध्ये पोलिसांनी एकूण ४२ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी सात जणांना वगळण्यात आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३२ जणांविरोधात हा खटला सुरू आहे. मागील सुनावणीत सर्व ३२ आरोपी न्यायालयात हजर होते आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संशयितांच्या बाजूने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर आणि ॲड. शाम पाटील यांनी युक्तिवाद केला.

 belgaum

या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत बारमाजी चिट्टी, वृषेशण चंद्रकांत पाटील, सामाजी बाबूराव हत्तीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगप्पा धामणेकर, परशराम मारुती कुंडेकर, महेश हनमंत कानशिदे, विशाल शिवाजी गोरल, अमर बळीराम पाटील, बैरू मनू कुंडेकर, किरण नारायण उदाकेकर, मोहन मारुती कुगाजी, बरमा मनोहर हळगेकर, रमेश जयराम गाडी, उदय विकास पाटील, विलास यल्लप्पा पाटील, सागर शिवाजी कुंडेकर, बाबू कचु कानबरकर, रोहित सुरेश धामणेकर, अनिल महादेव धामणेकर, चांगप्पा आनंद मिसाळे, मिथुन चांगप्पा शहापूरकर, सागर मारुती पाटील, किशन सांबरेकर, सूरज यल्लप्पा गाडी, विशाल अशोक टक्केकर, अमोल शिवाजी जाधव, राजू यल्लप्पा तोपिनाकाट्टी, अनिल शंकर कंग्राळकर, सागर यल्लप्पा काकडकर, संतोष रमेश मेळगे, बाबू बैरू मेळगे, मिंटू पिराजी बेकावाडकर, अरुण बोमानी गोरल, सुहास रामचंद्र पाटील, राहुल अर्जुन अस्तेकर, उमेश शंकर सांबरेकर, योगेश पिराजी माजूकर, अमित कृष्णा पाटील आणि प्रवीण परशराम बागेवाडी यांचा समावेश आहे.

हा खटला सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लढ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.