बेळगाव लाईव्ह :यल्लम्मा सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिरात काल रविवारी 3 लाखांहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवरात्रीची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असल्या तरी मोठी वाहतूक कोंडी होऊन दर्शनासाठी बराच वेळ लागला.
मंदिर आवारामध्ये 500 रुपयांच्या विशेष रांगेत असलेले भाविक 1 तास, 100 रुपयांच्या रांगेत असलेले भाविक सुमारे 3 तास उभे होते, तर मोफत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 5 -6 तास तिष्ठत थांबावे लागले.




