बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील उज्वला बडवाण्णाचे यांची थेट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे बेळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या हिंदी सल्लागार समितीने अलीकडेच आपल्या कार्यकारिणीची पुनर्रचना केली असून, त्यात नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
बेळगावचे राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी यांच्यासोबत आता उज्वला बडवाण्णाचे यांनाही या महत्त्वाच्या समितीवर स्थान मिळाले आहे. ही नियुक्ती बेळगाव जिल्ह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली एक मोठी ओळख मानली जात आहे.




