बेळगाव लाईव्ह : “भुंकणाऱ्या कुत्र्याला आम्ही उत्तर देणार नाही. हत्ती चालत असताना कुत्रे भुंकणे सामान्य आहे,” अशा शब्दांत हुक्केरी मतदारसंघाचे आमदार निखील कत्ती यांनी अण्णासाहेब जोल्ले यांना कुत्र्याची उपमा दिली आहे.
आमदार निखिल कत्ती यांच्या या वक्तव्यानंतर हुक्केरीमधील राजकारणात हा नवा वाद पेटला आहे.
हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना, त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना आगामी काळात योग्य उत्तर देऊ, असे स्पष्ट केले.
“आमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचल्यामुळे आम्ही निवडणूक लढवली. रणनिती त्यांनी आखली होती, पण लोकांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे,” अशा शब्दांत त्यांनी जारकीहोळी बंधूंनाही प्रत्युत्तर दिले.



