बेळगाव लाईव्ह: मोरारजी देसाई निवासी शाळेतील 77 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे त्या विद्यार्थ्यांवर चिकोडी आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा पाण्यातून झाली की सकाळी नाश्यात खालेल्या उपिटातून हे स्पष्ट झालेले नाही.
या प्रकाराने राज्यभर खळबळ माजली असून, अत्यवस्थ मुलांची आमदार प्रकाश हुक्केरींनी भेट घेतली आहे. आरोग्यमंत्री दोन दिवसांत चिकोडीला भेट देण्याची शक्यता आहे. बहुतेक मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे; मात्र एका विद्यार्थ्याला बेळगावला हलवण्यात आले आहे.
तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत 400 विद्यार्थी शिकतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान उपीट खाल्ल्यानंतर मुलांना उलटी, जुलाब, पोटदुखी सुरू झाले. तसेच ताप आला. त्यामुळे तातडीने घटनास्थळी आरोग्य पथक दाखल झाले,
प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर 70 विद्यार्थ्यांना चिकोडी तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये व 7 विद्यार्थ्यांना माता-शिशू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


