बेळगाव लाईव्ह :मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण भरून त्याची पातळी 2079.50 फूट इतकी वाढली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात असून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे मलप्रभा धरणामध्ये सध्या 1500 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी आज शनिवारी सकाळी 8
वाजेपासून मलप्रभा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग 300 क्युसेकवरून 1500 क्युसेकपर्यंत करण्यासाठी हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल.
दरम्यान मलप्रभा धरणाच्या प्रवाहाच्या दिशेला असणाऱ्या काठावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.



