बेळगाव लाईव्ह : -मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे, धरणाची पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी २०२५ फूट असून, सध्या धरणात दर सेकंदाला ३००० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, आज दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मलप्रभा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
सध्या नदीत १०००
क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तो टप्प्याटप्प्याने वाढवून ५००० क्युसेक्स केला जाईल.
यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


